Wednesday, December 5, 2012

ऑडीओ सॉफ्टवेअरस्

आवाजाचे रेकॉर्डिंग, गाण्याचे रेकॉर्डिंग तसेच ऑडीओ एडिटिंग, विविध प्रकारचे ईफेक्टस्, करोके, ईत्यादिसाठी ऑडीओ सॉफ्टवेअरसचा उपयोग होतो. तुम्ही एखाद व्हिडीओ पाहत आहात आणि त्यातले फक्त एखादे गाणे तुम्हाला हवे असेल तर तेही तुम्हाला ते रेकॉर्ड करता येवू शकते. काही ऑडीओ सॉफ्टवेअरस् फक्त करोके साठी सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच काही सॉफ्टवेअरसचा उपयोग फाईलचे एक्सटेंशन बदलण्यासाठी होतो. उदा. MP3 फाईल WAV किंवा WMA मध्ये बदलता येवू शकते.

Tuesday, December 4, 2012

जनरल सॉफ्टवेअरस्

'जनरल सॉफ्टवेअरस्' मध्ये अशी सॉफ्टवेअरस् आहेत जी विविध कामासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. उदा. फाईल रिनेमर, फोल्डर मार्कर, विविध व्हिडीओ-ऑडीओ एकत्र करून त्याची एक सलग फाईल करणारी सॉफ्टवेअरस्, फोल्डर लॉकरस्, डुप्लीकेट फाईलस् शोधणारी सॉफ्टवेअरस् ईत्यादि...

Advanced Renamer - Batch rename utility














ह्या  सॉफ्टवेअर मधून आपण विविध मल्टीपल फाईलस् आणि फोल्डर्स एकाच वेळी रिनेम करू शकतो.
१३ विविध पद्धतीने फाईलचे नाव बदलता येते. त्या १३ पद्धती खालील प्रमाणे आहेत :

१) नविन फाईल नेम (New name method)
२) फाईलच्या नावाची केस बदलणे (Change case of file name) - फाईलच्या नावाची केस म्हणजे अप्पर केस, लोअर केस ई...
३) फाईलच्या नावाचा एखादा भाग काढून टाकणे (Remove / Delete part of filename)
४) फाईलच्या नावामधून एखादा पॅटर्न काढून टाकणे (Remove pattern from filename)
५) फाईलच्या नावाचा एखादा भाग रिप्लेस करणे (Replace part of filename)
६) फाईलच्या नावामध्ये नवीन नाव टाकणे (Add / Insert text into filename)
७) फाईलच्या नावामधील काही अक्षरे / भाग काढून टाकणे (Move part of filename)
८) प्रत्येक फाईलफाईलचीफाईलचीफाईलचीला वेगवेगळे नाव देणे (New names based on a list of names)
९) फाईलची विशेषता बदलणे (Change file attributes)
१०) फाईलचा टाइमस्टैम्प बदलणे - डेट व वेळ (Change file timestamp)
११) ट्रीम पद्धती - रिकाम्या जागा, नको असलेली अक्षरे इ... (Trim filenames)
१२) क्रमांक पध्दती - (Renumbering)  
१३) लिपी पद्धती - (Custom batch script)

अश्या प्रकारे हे सोफ्टवेअर अनेक फाईलसच्या एकाच वेळी रिनेमिंगसाठी उपयुक्त आहे. 

वेबसाईटची लिंक :


CCleaner - Optimization and Cleaning

 

 












आपण  रोज विविध वेबसाईटसना ब्राउझरमधून भेट देत असतो. तेंव्हा अनेक कुकीज, तात्पुरत्या फाईलस् आपल्या संगणकामध्ये डाऊनलोड होत असतात. त्याच बरोबर आपण देत असलेल्या वेबसाईटसची एक हिस्ट्रीसुद्धा तयार होते असते. ह्या व्यतिरिक्त आपल्या संगणकामध्ये तात्पुरत्या फाईलस्, लॉग फाईल्स तसेच जुन्या रजिस्ट्री तयार होत असतात.

हे सोफ्टवेअर नको असलेला सर्व डाटा म्हणजे ब्राउझरच्या कुकीज, तात्पुरत्या फाईलस, जुन्या रजिस्ट्री, रिसायकल बिन मधील डाटा डीलिट करते. त्यामुळे आपल्या संगणकाचे कार्य सुरळीत चालू राहते. तसेच नको असलेला डाटा डीलिट झाल्यामुळे संगणकाच्या स्पीड मध्ये चांगला फरक पडतो.

वेबसाईटची लिंक :

Easy Duplicate File Finder - Find Duplicate Files Instantly!

















अनेक डुप्लीकेट फाईलस् आपल्या संगणकामध्ये असू शकतात परंतु, आपणास त्याबद्दल माहिती नसते. एखादी फाईल आपण दुसऱ्या ठिकाणी कॉपी करतो परंतु, ओरिजिनल फाईल डीलिट करण्यास विसरतो. संगणकामध्ये असलेल्या डुप्लीकेट फाईलस् शोधण्याचे हे सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे काम करते. हे सोफ्टवेअर डुप्लीकेट ऑडिओ फाईलस्, व्हिडीओ फाईलस्, इमेज फाईलस्, इ-मेल शोधून काढते.

वेबसाईटची लिंक :